Government Employee Dies in Kolhapur Road Accident
esakal
बांबवडे (कोल्हापूर) : पत्नी आणि मुलांना दवाखान्यात घेऊन निघालेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा काल येथे अपघाती मृत्यू झाला. महसूल सहायक मारुती विठ्ठल मकर (वय ३५, सध्या रा. शाहूवाडी मूळ गाव उंबरे दहिगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) असे त्यांचे नाव आहे. या अपघातात त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले गंभीर जखमी आहेत. त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले (Shahuwadi road accident latest news) आहे.