

Kolhapur Road Pothole
sakal
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीपूर्वी कोल्हापूरची ओळख ‘खड्डेपूर’ अशी झाली. ऐन निवडणुकीत शहरातील रस्त्यांना घाईघाईने डांबर लागले. मात्र, निवडणूक झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम बंद झाले आहे. खड्डे बुजविण्याचेही काम ठप्प आहे. सहाजिकच निवडणुकीसाठीच हा दिखावा झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत.