कोल्हापूर : सोन्या मारुती चौकातील बंद घराचे कुलूप, बेडरूमच्या कपाटाचे कुलूप बनावट चावीने उघडून १८ तोळे दागिन्यांसह वीस लाखांचा ऐवज चोरट्याने पळविला. घरमालक कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी २५ ते ३१ मे या कालावधीत बाहेरगावी गेले असताना हा प्रकार घडला. याबाबत शुभांगी सुजय म्हेत्रे (वय ५०) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.