Kolhapur
Kolhapur

कोल्हापूर : CM शिंदेंविरोधात संजय पवार आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात

एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.
Published on

कोल्हापूर : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांच्या दौऱ्याला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करत होते. शिवसैनिक या ठिकाणी जमू लागल्यानंतर पोलिसांनी संजय पवार यांच्यासह काही शिवसैनिकांना ताब्यात घेतलं. (Kolhapur Sanjay Pawar is aggressive against CM Shinde visit police took him into custody)

Kolhapur
Eknath Shinde : शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपद मिळणार? हे नाव चर्चेत

पोलिसांनी चुकीच्या पद्धतीनं शिवसैनिकांना अटक केली आहे, शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरु असताना कोणतीही नोटीस न देता पोलिसांनी संजय पवार आणि शिवसेना कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप शिवसेसैनिकांनी केला आहे. खरंतर या खऱ्या शिवसैनिकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालू आहे.

Kolhapur
ठाकरे कुटुंबाला दृष्ट लागू नये हाच प्रयत्न; बंडखोर आमदाराचं विधान

संजय पवार म्हणाले, राठोडनं काय केलं हे सर्व देशानं बघितलं. त्यांच्यावर किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले. आता सोमय्या आणि फडणवीस यांची तोंड का बंद आहेत. चित्रा वाघ राठोडांना आता का राखी बांधत नाहीत. राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रात या सरकारची लवकरच धोबीपछाड होईल. याचसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांचा इथं निषेध करतोय.

Kolhapur
औरंगाबादमधील पाचही बंडखोरांना आमदारांना आडवं करू; खैरेंचा इशारा

दरम्यान, आंदोलनापूर्वीच कोल्हापूर पोलिसांनी शिवसेना नेते संजय पवार यांच्यासह युवासेनेचे प्रमुख पदाधिकारी जिल्हाप्रमुख मंजित माने व युवासेना उपशहर प्रमुख वैभव जाधव यांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com