कोल्हापूर : शाळांचा मुहूर्त दोन दिवसांनी वाढला

सरकारी शाळांकडे ओढा
 शाळांचा मुहूर्त आता १५ जून ठरला आहे.
शाळांचा मुहूर्त आता १५ जून ठरला आहे. sakal
Updated on

कोल्हापूर : येत्या सोमवारी सुरू होणाऱ्या शाळांचा मुहूर्त आता १५ जून ठरला आहे. शाळा परिसर स्वच्छतेसह रंगरंगोटी अंतिम टप्प्यात असून, बुधवार (ता. १५)पासून शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. याच दिवशी सकाळी सर्व शाळांत विद्यार्थ्यांचे स्वागत होईल. दरम्यान, महापालिका, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळाही नवीन शैक्षणिक वर्षासाठी सज्ज झाल्या असून, शिक्षक व पालकांबरोबरच विविध सेवाभावी संस्थांच्या सहयोगातून शाळांत विविध भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

शासनाने तेरा जूनला शाळा सुरू होणार, असे जाहीर केले; पण राज्यातील काही भागात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे कालच्या निर्णयानुसार शाळा पंधरा जूनपासून सुरू होतील, असे म्हटले आहे. तेरा जूनपासून शिक्षक व कर्मचारी शाळांत उपस्थित राहतील. शाळा व परिसराच्या स्वच्छतेबरोबरच कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करतील आणि पंधरा जूनपासून प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत येणार आहेत.

गेल्या आठ ते दहा वर्षांचा विचार केला तर सरकारी शाळांना पालकांची पसंती मिळते आहे. वर्गखोल्या कमी पडतील, अशी शक्यता आहे. तिथे शिक्षक व पालकांनी वर्गणी काढून नवीन वर्गखोल्या बांधल्या आहेत. महापालिकेच्या नेहरूनगर शाळेचाच विचार केला, तर शिक्षकांच्या वर्गणीतून एक वर्गखोली बांधली. बांधकाम सुरू असताना सर्व शिक्षकांचा सहभाग राहिला. मुख्याध्यापक शहाजी घोरपडे निवृत्त होणार असले, तरी महिनाभर शाळेतील विविध सुविधांसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता आणखी एक वर्गखोली बांधली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government corporation chairman news
Maharashtra ST diesel price hike impact
Why are farmers protesting against Shaktipeeth Expressway?
Ichalkaranji Crime News
Marathi News Esakal
www.esakal.com