
कोल्हापूर : जिल्ह्यातील शाळा स्वयंमूल्यमापनात अव्वल
कोल्हापूर : शाळा सिद्धी मूल्यमापनाद्वारे राज्यातील शाळांची श्रेणी दरवर्षी निश्चित करण्यात येते. यावर शाळांचा दर्जा ठरवण्यात येतो. यात शाळांची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शाळांचे अभिलेख, सहशालेय उपक्रम आदी मुद्द्यांचा समावेश आहे. शाळांनी स्वयंमूल्यमापन करून अहवाल सादर करायचा आहे. या अहवालाच्या आधारेच जिल्ह्यातील शाळांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उपक्रमात ३० एप्रिलपर्यंत ३ हजार ६८८ शाळांनी सहभाग घेतला. यातील ३ हजार ६४२ शाळांनी स्वयंमूल्यमापन ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले. यातील २६ शाळा बंद झाल्याने त्यांनी स्वयंमूल्यमापन केले नाही. सर्व शाळांनी मूल्यमापन केल्यानंतर राज्याने या सर्वांचा अहवाल तयार केला आहे. त्याआधारे गुरुवारी शिक्षण विभागाने याची माहिती प्रसिद्ध केली. यात कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिला आला आहे. तर सांगली (दुसरा), सोलापूर (तिसरा), सिंधुदुर्ग (चौथा) तर अहमदनगरने पाचवा क्रमांक पटकावला आहे. या उपक्रमात सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांचा समावेश होता.
शासनाने दिलेल्या मुदतीत मूल्यांकन पूर्ण झाल्यानेच जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. आता ज्या वर्गवारीत कमी गुण मिळाले आहेत, त्यात आता सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील शाळा या स्वयंमूल्यमापनात अव्वल ठरल्या आहेत. शाळांचे मुख्याध्यापक, समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी यांनी याकामी मोठी मेहनत घेतली. शाळांनीही याला चांगला प्रतिसाद दिला. यामुळेच राज्यात जिल्ह्यातील शाळांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांचे अभिनंदन.
- एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी
Web Title: Kolhapur Schools District Excel Self Assessment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..