

कोल्हापूर : जिल्ह्यात होणारे नदी प्रदूषण राेखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामासाठी प्रशासकीय काळात १८१ कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिला आहे. वर्षात काम पूर्ण करण्याची मुदत असताना वर्ष होत आले तरीही ठेकेदारांनी कामे सुरू केलेली नाहीत. यामध्ये काही ठिकाणी जागेची समस्या आहे, काही ठेकेदारांनी खोदाई करण्यापर्यंतच काम केल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषदेचा सत्तर टक्के आणि ग्रामपंचायतीचा तीस टक्के निधी असा जिल्ह्यातील सुमारे शंभर कोटींपर्यंतचा निधी असणाऱ्या या महत्त्वाच्या कामांना गती मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.