

Late Shankarrao Patil-Kaulvkar during his tenure as Zilla Parishad President.
sakal
भोगावती कारखान्यात शिपाई, त्यानंतर उच्च शिक्षण घेऊन काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरी; पण त्यातही मन रमत नाही म्हटल्यावर वकिलीचे शिक्षण घेऊन वकील व्यवसायाला सुरुवात केलेले आणि पहिल्यापासून समाजसेवेची आवड असेलेल्या कै. शंकरराव बाळा पाटील-कौलवकर यांनी थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाला गवसणी घातली. एवढेच नव्हे तर सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा विक्रम अजूनही त्यांच्याच नावावर आहे.