

Kolhapur Shivaji Peth Ambulance Delayed By Mandaps Woman Dies After Reaching Hospital Ten Minutes Late For Treatment
sakal
कोल्हापूर: रक्तदाब खालावल्याने शिवाजी पेठेतील नलिनी गणेश माईणकर (वय ८२, रा. वांगी बोळ) यांची प्रकृती ढासळली. कुटुंबीयांनी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका येण्यास थोडा उशीर झाल्याने वारंवार फोनही केले. कसेबसे माईणकर यांना रुग्णालयात नेण्यात आले. ‘तुम्ही पोहोचायला दहा मिनिटे उशीर केला, ’ असे डॉक्टरांचे उत्तर ऐकून माईणकर कुटुंबीयही हेलावले.