Kolhapur : विद्यापीठात संध्याकाळी फिरण्यास प्रवेश द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivaji university

Kolhapur : विद्यापीठात संध्याकाळी फिरण्यास प्रवेश द्या

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परिसरात सकाळी व्यायामासाठी फिरण्यास प्रवेश दिला जातो. मात्र, संध्याकाळी दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना या रम्य परिसरात व्यायामासाठी फिरण्यास मिळत नाही. संध्याकाळीही नागरिकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.

या मागणीचे निवेदन त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा वृक्षराजीने नटलेला आहे.

या परिसरात सकाळी व्यायाम करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. शहरातील संध्याकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यांना विद्यापीठ परिसरात प्रवेश दिला जात नाही. कोव्हिडच्या काळात हा नियम केला होता. मात्र, आता सर्व बंधने खुली केली आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संध्याकाळीही या परिसरात नागरिकांना प्रवेश द्यावा. त्यामुळे नागरिकांना मोकळ्या आणि शुद्ध हवेत फिरण्याचा आनंद घेता येईल.

Web Title: Kolhapur Shivaji University Evening Walk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..