
Kolhapur : कोल्हापूर जिल्हाप्रमुख पदावरून निर्माण झालेली खदखद, त्यातून युवा कार्यकर्त्यांनी सोडलेला पक्ष, पक्षाच्या उपनेत्यांनी दिलेला राजीनामा या शिवसेना ठाकरे गटातील भूकंपामुळे महाविकास आघाडीतच अस्वस्थता निर्माण झाली आहे. कोल्हापूर हा शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरही हा गड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पुन्हा त्याचे बुरूज ढासळू लागल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे.