कोल्हापूरची दिल्ली होऊ नये ; धुलीकण प्रमाण वाढले | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pollution

कोल्हापूरची दिल्ली होऊ नये ; धुलीकण प्रमाण वाढले

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील हवेची स्थिती (एअर क्वालिटी इंडेक्स) चिंताजनक आहे. हवेत धुलीकणाचे प्रमाण वाढले आहे. धुके आणि धुलिकण यांच्या संयोगाने ‘फोटोकेमिकल स्मॉग’ निर्माण होण्याचा धोका संभवतो. यामुळे श्वसनाचे विकार, दमा, अस्थमा असे विकार बळावण्याची शक्यता असते. दिल्लीत हवेची स्थिती अशीच चिंताजनक झाल्याने तेथे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. ही वेळ कोल्हापूरकरांवर येऊ नये, यासाठी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात थंडीचा आंनंद घेत सकाळी आणि संध्याकाळी फिरणारे लोक पाहायला मिळतात. धुक्यात फिरण्यात वेगळाच अनुभव असतो. मात्र पाच वर्षात हिवाळ्यात धुलीकणामुळे हवेची स्थिती दयनीय होते. कारण हवेत धुलीकण अधिक असतात. खालच्या स्तरातील हवा खाली तर वरच्या स्तरातील हवा वरच राहते. हवा एकमेकात मिसळत नाही. (इव्हर्जन प्रक्रिया) धुके आणि धुलिकण यांच्यामुळे ‘फोटोकेमिकल स्मॉग’ तयार होतो. याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होतो. संध्याकाळी शहरावर हवेचा एक थर दिसून येतो. सध्या हवेत आद्रता आणि बाष्प अधिक दिसून आले आहे. आठ दिवसातील शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स हा खराब ते धोकादायक या स्थितीत दिसून येतो.हिवाळ्यात नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी दूरदर्शीपणे आराखडा आखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हवा प्रदुषणात कोल्हापूरची दिल्ली होण्यास वेळ लागणार नाही.

मानवी शरीरावर होणारे परिणाम

  1. दमा, अस्थमा, श्वसनाचे विकार बळावतात

  2. घसा खवखणे, सर्दी होते

  3. गुदमरल्यासारखे होते

  4. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना त्रास

loading image
go to top