Kolhapur Voter List Revision : एसआयआर अर्जावर सही नाही करणार; दीड हजार नागरिकांची ठाम भूमिका, दक्षिण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक विरोध

Kolhapur SIR voter list revision latest news : कोल्हापूर जिल्ह्यात SIR मतदार यादी पुनरिक्षणादरम्यान अनेक नागरिकांनी गणना अर्जावर सही करण्यास नकार दिला. त्यामुळे सुमारे 1,641 मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे.
SIR Process in Kolhapur

SIR Process in Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : कोणाचा सरकारवर राग, तर कोणाला मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मान्य नाही, तर कोणाला निवडणुकीच्या प्रक्रियेतच सहभाग घ्यायचा नाही. अशा व्यक्तींनी एस.आय.आर प्रक्रियेतील गणना अर्जावर सहीच केलेली नाही. त्यामुळे त्यांचे नाव मतदार यादीमध्ये येणार नाही. अशा नागरिकांची संख्या सुमारे हजार (Kolhapur electoral roll revision unsigned forms) आहे. त्याची नोंद शासनाने इतर (ऑदर) अशी केली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात सुमारे ६९८ जणांची नोंद इतर या रकान्यात झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com