Kolhapur SIR: जिल्ह्यात ‘एसआयआर’चे १०० टक्के काम पूर्ण

SIR Verification Completed Across Kolhapur District: २९ लाखांहून अधिक मतदारांची पडताळणी झाली असून, ४.५० लाखांहून अधिक मृत, दुबार, अनुपस्थित व कायम स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया होणार आहे.
Kolhapur SIR

Kolhapur SIR

esakal

Updated on

कोल्हापूर: भारत निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या सखोल मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम आज पूर्ण झाली. यामध्ये जिल्ह्यात २९ लाख चार हजार ८८६ मतदारांची पडताळणी (डिजिटलायझेशन) होऊन १०० टक्के काम पूर्ण झाले. यामध्ये सर्वाधिक राधानगरी मतदारसंघात तीन लाख १४ हजार ४९५ मतदारांची पडताळणी पूर्ण झाली. यावर हरकतींसाठी महिन्याचा तर सुनावणींसाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे. प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com