कोल्हापूर : मतदार यादीबाबत सहा हरकती

कार्यालय क्रमांक तीनमध्ये दोन हरकती आल्या आहेत
kolhapur municipal corporation
kolhapur municipal corporationsakal

कोल्हापूर : महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीबाबत आज एका दिवशी सहा हरकती दाखल झाल्या. आतापर्यंतच्या हरकतींची संख्या १३ झाली आहे. २३ जूननंतर आज प्रथमच जास्त हरकती आल्या आहेत. हरकतीसोबत मतदारांच्या रहिवासाचे पुरावे जोडावे लागत असल्याने संख्या कमी आहे; पण आता सर्व हरकती घेण्यास सांगितले जाणार असून, आता संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आज विभागीय कार्यालय क्रमांक एकमध्ये चार, तर विभागीय कार्यालय क्रमांक दोनमध्ये दोन अशा हरकती दाखल झाल्या. आतापर्यंत कार्यालय क्रमांक एकमध्ये सात, कार्यालय क्रमांक दोनमध्ये चार, कार्यालय क्रमांक तीनमध्ये दोन हरकती आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com