

Slum voters in Kolhapur
sakal
कोल्हापूर : निवडणूक कोणतीही असो, मतदानासाठी नेहमीच भरघोस प्रतिसाद देणाऱ्या शहरातील झोपडपट्ट्यांमधील प्रश्न मात्र आजही बहुतांशी ‘जैसे थे’च आहेत. मतदान करणाऱ्या या घटकाकडे अपवाद वगळता बहुतांश नेत्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. परिणामी, झोपडपट्टीच्या बोळात कधीही पाय न ठेवलेला वर्गही झोपडपट्ट्यांवर तावातावाने टीका करताना दिसतो. अशा परिस्थितीत या टीकेचा शाप दूर करून झोपडपट्टीवासीयांच्या किमान मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी प्रयत्न होणार का, हाच प्रश्न आहे.
- शिवाजी यादव