कोल्हापूर : ‘जल जीवन’साठी सोलर वीज

गावाच्या थकीत वीजबिलांना पर्याय
Kolhapur ZP
Kolhapur ZP sakal
Summary

गावाच्या थकीत वीजबिलांना पर्याय

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या (kolhapur jilha parishad) ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. जिल्‍ह्यात राबविल्या जाणाऱ्या या पाणी योजनांना सोलर विजेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यासाठी प्रोत्‍साहन दिले जात आहे. सध्या पाणी योजनांच्या विजेची बिले भरली जात नसल्याने वीजपुरवठा (eletricty)खंडित केला जातो. याचे अनेक परिणाम होत आहेत. त्यामुळेच जास्‍तीत जास्‍त पाणी योजनांसाठी सोलर विजेचा वापर केला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिली.

जिल्‍ह्यातच नव्‍हे तर राज्यात सर्वत्रच ग्रामीण पाणी योजनेंच्या वीज बिलाचा प्रश्‍‍न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात बिल येत असल्याने ग्रामपंचायती त्या भरू शकत नाहीत. शासनाकडूनही अनुदान मिळताना अनेक अडचणी येत आहेत. दोन वर्षांत कोरोनामुळे अर्थव्यवस्‍थाच ढासळली आहे. वसुलीही ठप्‍प झाली आहे. परिणामी, पथदीप आणि पाण्याची बिले भरलेली नाहीत. त्यामुळे महावितरणने पाणी योजनांची वीज खंडित करण्याचा धडाका लावला आहे. हा प्रश्‍‍न कायमस्‍वरूपी निकाली काढण्यासाठी सोलरचा वापर करणे आवश्यक आहे.

Kolhapur ZP
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर फुललं हसु; जातिवंत खिल्लार 10 लाखांवर जाणार

२५ पेक्षा अधिक गावांच्या पाणी योजनांना सोलर वीज

केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेंतर्गत सध्या गावांच्या पाणी योजनांचे आराखडे करण्याचे काम सुरू आहे. काही गावांचे आराखडे पूर्णही झाले. त्यामुळे हे आराखडे करताना सोलरची व्यवस्‍थाही करण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत २५ पेक्षा अधिक गावांच्या पाणी योजनांसाठी सोलर विजेची तरतूद केली. काही गावांनी यापूर्वीच पाणी योजनांसाठी सोलरचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. असे झाले तर वर्षभरात किमान ५० टक्‍के गावांच्या पाणी योजना सोलरवर असतील, असा विश्‍वास श्री. चव्‍हाण यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com