कोल्हापूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याला गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

admission

कोल्हापूर : अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या टप्प्याला गती

कोल्हापूर : अकरावी प्रवेश केंद्रीय प्रक्रियेत अन्य बोर्डाचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. आजपर्यंत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी गुण समकक्ष करून घेतले. यात काही परराज्यांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अकरावी प्रवेशप्रक्रियेला गती आली असून, अर्जाचा दुसरा भाग भरण्यास सुरुवात करण्यात आली.

शहरात काही वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबवली जाते. यंदा दहावीचा निकाल लागून महिना झाला, तरी प्रवेशाची अंतिम यादी लागलेली नाही. कारण अन्य बोर्डाचे निकाल अपेक्षेपेक्षा उशिरा लागले. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबली होती. मात्र, सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यावर पुन्हा अकरावी प्रवेशप्रक्रियेला गती आली आहे. स. म. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयात अन्य बोर्डाचे विद्यार्थी गुण बेस्ट ऑफ फाईव्हनुसार समकक्ष करून घेतात. आतापर्यंत सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी गुण समकक्ष करून घेतले आहेत. आता तेही केंद्रीय प्रवेशप्रक्रियेत सहभागी होतील. ज्यांनी अद्याप पहिला भाग भरला नसेल, तेही भरू शकतात. पुढील प्रक्रिया वेळापत्रकानुसार पार पडेल.

वेळापत्रक असे

(फक्त कोल्हापूर शहरातील प्रवेश)

२५ ते ३० जुलै- नवीन विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भाग-१ व भाग-२ भरता येईल. ज्यांचा अर्ज नामंजूर झाला आहे, त्यांनी त्यातील त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज भरावा. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी आपले गुण एस. एम. लोहिया कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन समकक्ष करावेत. या विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाला नसल्यास ऑनलाईन मिळालेले गुणपत्रक व शाळा सोडल्याच्या दाखल्याचे हमीपत्र अपलोड करता येईल (हमीपत्र संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा

ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेबद्दल काही तक्रार असल्यास किंवा महाविद्यालय मिळण्याबाबत काही अडचण असल्यास ८ व ९ ऑगस्ट या दोन दिवसांत संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने तक्रार स्वीकारली जाणार नाही.

प्रक्रिया अशी

१ ते ४ ऑगस्ट- अर्जांची ऑनलाईन छाननी होईल.

५ ते ७ ऑगस्ट- निवड यादी तयार करणे.

८ ऑगस्ट - www.dydekop.org या संकेतस्थळावर सकाळी अकराला अंतिम निवड यादी जाहीर होईल.

८ ते १० ऑगस्ट- आपले नाव असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे.

Web Title: Kolhapur Speed Up Second Phase Class 11 Admission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..