Water Conservation: कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखान्यांना पाणी बचतीचे निर्देश; पुनर्वापरावर भर

Sugar Factories Water Conservation, Kolhapur Sugarcane Season : कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा, असे निर्देश दिले.
Kolhapur Collector Directs Sugar Factories to Conserve Water and Promote Sustainable Farming

Kolhapur Collector Directs Sugar Factories to Conserve Water and Promote Sustainable Farming

esakal

Updated on: 

कोल्हापूर: पावसाचे प्रमाण यावर्षी कमी असल्याने उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. आगामी साखर गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जनावरांच्या चारा व्यवस्थापन व पाणी बचतीबरोबरच पर्यावरणपूरक शेतीला प्राधान्य द्यावे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासोबतच कारखान्यांमध्ये पाण्याच्या पुनर्वापराचे प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज येथे दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com