कोल्हापूर : सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी राज्यातील सहकारी व खासगी ४१ साखर कारखान्यांना ११२ कोटी १० लाखांचे अनुदान मंजूर झाले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा समावेश असून, या कारखान्यांना १२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. .Sangli Crime: अलार्म तोडला...मेसेज गेला...पोलिस आले अन् डाव फसला.दरम्यान, अनुदान मिळालेल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांत छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना( कागल), रेणुका शुगर (इचलकरंजी), शरद (नरंदे), दूधगंगा-वेदगंगा (बिद्री), जवाहर फेज १ आणि फेज २ यांचा समावेश आहे.राज्यात बगॅसपासून सहवीजनिर्मिती करणाऱ्या सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांना अनुदान दिले जाते. महावितरणकडून ही वीज प्रतियुनिट सहा रुपयाने खरेदी केली जाते. यावर शासनाकडून प्रतियुनिट एक रुपये ५० पैसे अनुदान दिले जात आहे. त्यानुसार हे अनुदान दिले जात आहे. राज्यातील ४८ कारखान्यांनी अनुदानासाठी प्रस्ताव पाठवले होते. .मात्र, यापैकी शासनाच्या नियम आणि अटीमध्ये बसणारे ४१ कारखाने पात्र ठरवले आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या या रकमेमुळे कारखान्यांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळणार आहे. सहवीजनिर्मितीमुळे कारखान्यांच्या खर्चात मोठी कपात होत आहे. हे प्रकल्प साखर कारखान्यांना वीजनिर्मितीच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यास मदत करत आहेत. कारखान्यांना लागणारी वीजनिर्मिती तर होतच आहे, याशिवाय याच वीजनिर्मित्तीतून कारखान्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्प पर्यावरणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरत आहेत. याच कारणामुळे शासनाकडून अनुदान दिले जाते. भविष्यात राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी सक्षमपणे वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करावेत, यासाठी शासनाकडून पाठबळ दिले जात आहे..राज्यातील सहवीजनिर्मितीसाठी अनुदानास पात्र कारखानेरेणा (लातूर), पराग ॲग्रो (पुणे), क्रांती अग्रणी (सांगली), ट्वेन्टीवन शुगर्स (नांदेड), माळेगाव (पुणे), श्रीपती शुगर (सांगली), सोमेश्र्वर (पुणे), विघ्नहर (पुणे), भीमाशंकर १ व २ फेज (पुणे), मोहनराव शिंदे (सांगली), खटाव माण (सांगली), यशवंतराव मोहिते (सातारा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (धाराशिव), राजारामबापू (वाळवा), बारामती ॲग्रो १ व २ (पुणे), जरंडेश्र्वर शुगर (सातारा)..Sangli News : स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार, आयुक्तांचा निर्णय.कारखाने व मिळालेले अनुदानसाखर कारखाना मिळालेले अनुदानशाहू साखर (कागल) २ कोटी ३१ लाखदूधगंगा-वेदगंगा (बिद्री) १ कोटी ४४ लाखजवाहर युनिट- १ (इचलकरंजी) १ कोटी ९३ लाखजवाहर युनिट -२ (इचलकरंजी) ३१ लाखरेणुका शुगर (कोल्हापूर) ५ कोटी २१ लाखशरद (नरंदे) १ कोटी ४२ लाख .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.