

Farmers prepare fields for summer groundnut sowing amid uncertainty over seed availability.
sakal
कुडित्रे : राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत २०२५/२६ उन्हाळी हंगामासाठी तेलबियांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी शासनामार्फत प्रोत्साहनपर योजना राबवली जात आहे. जिल्ह्यात सर्वत्र मशागत करून भुईमूग पेरणी सुरू झाली असताना अद्याप आयुक्तालयाकडून लॉटरी निघाली नसल्यामुळे बियाण्याचा पत्ता नाही.