Kolhapur Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh awarded Internal Security Service Medal
Kolhapur Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh awarded Internal Security Service Medal

कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक...

Published on

कोल्हापूर - देशातील नक्षलग्रस्त आणि जोखमीच्या भागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना केंद्र शासनाने आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर झाले. त्याचबरोबर इचलकरंजीचे उपअधीक्षक गणेश बिरादार व सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनाही हे पदक जाहीर झाले. जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांना हे पदक मिळाल्याबद्दल पोलिस दलात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी 2016 ते 2018 या काळात पोलिस अधीक्षक म्हणून गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केली होती. उपअधीक्षक गणेश बिरादार यांनीही नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय कामगिरी केली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी 2014 ते 2017 या काळात गडचिरोलीत दोन पोलिस ठाण्याचा पद्‌भार सक्षमपणे सांभाळला. त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकाराने त्यांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com