को्ल्हापूर : लक्ष्य ११४ कोटी; जमा २८ कोटी

महापालिकेच्या घरफाळा विभागासमोर वसुलीचे डोंगराएवढे आव्हान
को्ल्हापूर
को्ल्हापूर sakal
Updated on: 
Summary

महापालिकेच्या घरफाळा विभागासमोर वसुलीचे डोंगराएवढे आव्हान

कोल्हापूर : सध्या महापालिकेत चर्चेत असलेल्या घरफाळा विभागासमोर आर्थिक वर्षाअखेर वसुलीचे मोठे आव्हान उभे असणार आहे. अतंर्गत वादाचा परिणाम वसुलीवर दिसत असून, ११४ कोटींचे वसुलीचे लक्ष्य असताना या महिन्यापर्यंत केवळ २८ कोटी वसूल झाले आहेत. महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत सध्या गारठल्याच्या स्थितीत आहे. काळप्रमाणे हा विभाग अपटेड न झाल्याने वसुलीवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. आजही अनेक मिळकती आहेत की त्यांना फाळाच लागू झालेला नाही. अनधिकृत बांधकामाचे मजल्यावर मजले बांधले जात असताना अजूनही अनेक मिळकतींना त्यांच्या मूळ आकाराइतकाच घरफाळा लागू आहे. अनेक जुने थकबाकीदार असे आहेत त्यांची थकबाकी वाढत गेली. मात्र, ही थकबाकी वसूल काही झाली नाही.

पूर्वी मार्च महिना उजाडला आणि लाल रंगाची जीप रस्त्यावरून फिरू लागली की, थकबाकीदाराच्या अंगावर काटा उभा राहायचा. ‘घरफाळा वेळेत भरा आणि जप्तीसारखा कटू प्रसंग टाळा’ असे आवाहन ध्वनीक्षेपकावरून केले जात होते. लोकही वसुलीला प्रतिसाद द्यायचे. नंतर घरफाळा विभागाकडील कर्मचारी वसुलीसाठी दारात येऊ लागले. नंतर लोक नागरी सुविधा केंद्रात घरफाळा भरू लागले.

अमूक एका महिनाअखेर बिल भरल्यानंतर सवलत देण्याच्या योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. थकीत फाळ्यावर अठरा टक्यांचा दंड आकारला गेल्याने त्याचाही चांगला परिणाम मध्यंतरी दिसून आला. एखाद्या मिळकतीला नेमका किती फाळा आकारायचा हे घरफाळा विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या हाती आहे. टेप टाकून मापे घेताना मापात पाप न झाल्यास फाळा नियमानुसार लागू होतो. तसे न झाल्यास महापालिकेचे आर्थिक नुकसान होते.

गेल्या दोन वर्षापासून कोविडचे संकट आल्याने त्याचाही परिणाम वसुलीवर दिसून येत आहे. घरफाळा आणि पाणीपट्टीची वसुली झाल्याशिवाय पुढे वर्षभर आर्थिक गाडा रूळावर येत नाही हे पूर्वी स्पष्ट झाले आहे. वर्षानुवर्षे थकबाकीदार असलेल्यांची नावे जाहीर केली जातात. मिळकतीवर बोजा चढविणार असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष ही कारवाई होत नाही. पूर्वी एक दोन थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई झाल्यानंतर अन्य थकबाकीदार सावध व्हायचे. आता ही पद्धतही बंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com