
कोल्हापूर : गांजाच्या धुंदीत असलेले, दारू पिऊन तर्रर्र झालेल्यांच्या टोळक्यांच्या दहशतीमुळे शहरातील काही निवडक उद्यानांमध्ये रात्रपाळी करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी धजावत नाहीत. जीवावर बेतण्यापेक्षा तिथे नोकरीच नको, असे म्हणत हुतात्मा पार्क, पिकनिक पॉईंट अशा काही उद्यानांमधील रात्रीची नेमणूक नको म्हणत वरिष्ठांकडे मागणी केली जात आहे.