
कोल्हापूर : भारत-पाकिस्तानच्या १९६५ च्या युद्धातील थरार, १९७१ ला बांगलादेशच्या युद्धात मिळविलेला विजय, प्रसंगी जीव धोक्यात घालून शत्रूचा केलेला पराभव अन् शहीद जवानांच्या आठवणींना माजी सैनिकांनी आज येथे उजाळा दिला. निमित्त होते सातवी बटालियन दि मराठा लाईट इन्फंट्रीच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्याचे. माजी सैनिक सुपर सेव्हनतर्फे त्याचे आयोजन केले होते. महासैनिक दरबारात हा मेळावा झाला.