Vaccine Update: कोल्हापुरात 'या' दोनच केंद्रावर आता व्हॅक्‍सिनचा साठा

kolhapur vaccination update information kolhapur covid 19 marathi news
kolhapur vaccination update information kolhapur covid 19 marathi news

कोल्हापूर  : शहरात लसीकरण उद्यापासून अकरा केंद्राऐवजी केवळ दोनच केंद्रात सुरु राहणार आहे. व्हॅक्‍सिन संपल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी शहरातील फिरंगाई हॉस्पीटलजवळ लस घेण्यात आलेल्या नागरिकांना तीन तास तस्टस्थ उभे रहावे लागले.अखेर लस न घेताच परत फिरावे लागले. 

शासन आदेशाप्रमाणे कोविड-19 लसीकरण मोहिम 16 जानेवारी 2021 पासून आरोग्य कर्मचारी व फ्रंन्टलाईन वर्कर्संना पाहिल्या टप्यामध्ये लसीकरण करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्यामध्ये 60 वर्षावरील सर्व नागरीक तसेच 45 ते 59 वर्षातील व्याधीग्रस्त नागरीकांचे लसीरकरण सुरु करण्यात आले आहे. यानंतर तिसऱ्या टप्यामध्ये 1 एप्रिल पासून शहरामध्ये 45 वर्षावरील वयोगटातील नागरीकाना कोविड-19 लसीकरण सुरु करण्यात आलेले आहे. शासनाकडून आज अखेर 78120 इतक्‍या कोविड-19 डोसेसचा महापालिकेला पुरवठा झाला होता.

प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करुन आज अखेर 74057 इतक्‍या पात्र लाभार्थ्यांना पहिला डोसचे तर 8364 इतक्‍या पात्र लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. आज अखेर 45 वर्षावरील 30 टक्के नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध साठा पाहता उद्या (ता.8) प्राथमिक आरोग्य नागरी केंद्र सदरबाजार व फिरंगाई या ठिकाणी लसीकरण सुरु राहणार आहे. तसेच मान्यता प्राप्त खाजगी हॉसिपटलमध्ये कोविड-19 लस उपलब्ध असून रु.250/- इतके नाममात्र शुल्क आकारुन कोविड-19 लसीकरण करुन घेता येईल.

यामध्ये कोल्हापूर इंस्टिटयुट ऑफ ऑर्थोपेडीक व ट्रॉमा केअर सेंटर, मसाई हॉस्पिटल, ऍपल हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, डॉ.डी.वाय.पाटील मेडीकल कॉलेज, जोशी हॉस्पिटल व डायलेसीस सेंटर, डायमंड सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल, ओमसाई आँकॉलॉजी हॉस्पिटल, श्री सिध्दीविनायक हार्ट हॉस्पिटल, सनराईज हॉस्पिटल, सिध्दीविनायक नर्सिंग होम, मगदूम एंडोसर्जरी इंस्टीटयुट, अॅस्टर आधार हॉस्पिटल, मेट्रो मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटल, दत्त साई हॉस्पिटल, प्रिस्टीन हॉस्पिटल, मोरया हॉस्पिटल, अंतरंग हॉस्पीटल, गंगाप्रसाद हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलचा समावेश आहे. याठिकाणी गुरुवार (ता.8 ) कोविड-19 लसीकरण सुरु राहणार आहे. तरी ज्या पात्र नागरीकांनी लसीकरण केले नाही त्यांनी महापालिकेच्या दोन केंद्रावर अथवा खाजगी ठिकाणी लसीरकण करुन घ्यावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलवकडे यांनी केले.  

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com