कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग क्रांती घडवेल : प्रभू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 रेल्वे

कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग क्रांती घडवेल : प्रभू

कोल्हापूर : रेल्वेच्या माध्यमातून पश्‍चिम महाराष्ट्र कोकणला जोडला तर मोठी क्रांती होऊ शकते. यासाठी कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्ग करून पश्‍चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्याच अर्थसंकल्पात कऱ्हाड ते चिपळूण रेल्वेमार्ग करण्याचे धोरण होते, अशी माहिती माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपल्या व्याख्यानात दिली.

श्री. प्रभू म्हणाले, ‘‘पश्‍चिम महाराष्ट्र किंवा उर्वरित महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी नाही. कोकणला मात्र ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. हिच किनारपट्टी महाराष्ट्राची समजली जाते. रेल्वेमार्गाच्या माध्यमातून कोकणला उर्वरित महाराष्ट्र जोडला तर कोकणसह संपूर्ण महाराष्ट्राचे कल्याण होणार आहे. विशेषत: कोल्हापूरला साखर निर्यात करायची असेल तर मुंबईला जाण्याची गरज नाही. जवळच असणाऱ्या कोकणातून ती निर्यात करू शकतो. त्यामुळे रेल्वेमार्ग महत्त्वाचा आणि विकासाचा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘कोकणातील रस्ते चांगले नव्हते. हिच परिरिस्थिती इतर जिल्ह्यातही होती. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना १९९६ मध्ये गावागावांत पंतप्रधान ग्रामसडक योजना राबविण्याची सूचना मांडली आणि ती अमलात आणली. त्यामुळे गावोगावी रस्ते होऊ लागले. देशात ७ लाख ६०० किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. या किनारपट्टीवर लहान आणि मोठी अशी बंदरे आहेत.

लहान बंदरांची जबाबदारी राज्य शासनवर आणि मोठी बंदरांची जबाबदारी केंद्र सरकारकडे आहे; पण जो लहान आहे, तो कधी तरी मोठा होणार की नाही, असा प्रश्‍न होता. त्यामुळे बंदरांची जबाबदारी राज्य किंवा केंद्राकडे न करता सामूहिकपणे याचा विकास आणि विस्तार केला पाहिजे. बंदरांचा विकास करत असताना त्या आजूबाजूचाही विकास करून मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे, अशीही सूचना मांडली होती.’’ त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ‘सागर माला’ योजनेची घोषणा केली होती. ‘सागर माला’ प्रत्यक्षात आली तर त्याच्यासोबत इतरांचाही विकास होईल. याची क्षमताही चांगली आहे. हे सर्व आपण सहकारच्या माध्यमातून करू शकतो, असेही ते म्हणाले.

Web Title: Kolhapur Vaibhavwadi Railway Revolutionize Prabhu

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..