शहरात वाहन चोरटे सुसाट | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : शहरात वाहन चोरटे सुसाट

कोल्हापूर : शहरात वाहन चोरटे सुसाट

कोल्हापूर : शहर परिसरात वाहन पार्किंग करताय, तर मालकांनो वाहनांच्या सुरक्षेची तुम्हीच काळजी घ्या, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या वाहन चोरटे सुसाट असून ते भरदिवसाच वाहनांवर डल्ला मारू लागले आहेत. जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रकार नवे नाहीत. यापूर्वी मोटारसायकल, मोबाईल चोरीसारखे प्रकार तक्रारीविना रेकॉर्डवर येण्याचे प्रमाण कमी होते. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सूत्रे हाती घेतली.

त्यांनी ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील वाहन चोरीचे प्रकार पुढे येत आहेत. दिवाळीच्या काळात शहर परिसरात खरेदीदारासह पर्यटकांची गर्दी असते. रस्त्याकडेला मिळेल त्या जागी चालक वाहने पार्किंग करत असतात. अशी वाहने हेरून ती चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत.

हेही वाचा: नागपूर : कार्यकर्ता चतुर हवा, अतिशहाणा नको; केंद्रीयमंत्री गडकरी

चोरट्यांनी ऑक्टोबरमध्ये शहर परिसरात पार्किंग केलेल्या ३० वाहनांवर डल्ला मारला. यात दोन चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. चोरट्यांनी गजबजलेल्या ठिकाणाहून भरदिवसा १४ वाहने चोरण्याचे धाडस दाखवले. पोलिसांनी दोघा मोटारसायकल चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून मोटारसायकलीही जप्त केल्या. तरीही शहरात सीसीटीव्हीचे जाळे असूनही पार्किंग केलेल्या वाहनाच्या सुरक्षेबाबत मालकांतील धास्ती कायम आहे. या वाहन चोरट्यांच्या वेळीच मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी होत आहे.

हँडेल लॉक तुटणाऱ्या वाहनांवर निशाणा

हिसडा मारल्यानंतर वाहनांचे हँडेल लॉक सहज तुटू शकेल. अशी शहर परिसरातील वाहने हेरायची. त्यानंतर अशा वाहनांवर डल्ला मारण्याचा नवा फंडा चोरट्यांनी सुरू केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

वाहन मालकांना

हे अपेक्षित...

ब्लॅक स्पॉटवर रात्रीबरोबर दिवसाची गस्त वाढवा

सीसीटीव्हीची संख्या वाढवा

विना नंबरप्लेट वाहनांची तपासणी करा

loading image
go to top