कोल्‍हापूर : जनावरे दवाखान्यात, डॉक्‍टर घरात

सायंकाळनंतर पशुपालक, शेतकऱ्यांची अडचण; वेळेत बदल करण्याची मागणी
दुधाळ जनावरे.
दुधाळ जनावरे.Sakal

कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषद व पशुवैद्यकीय सहायक आयुक्‍त कार्यालयाच्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या वेळात गतवर्षी बदल केला आहे. गेल्या वर्षीपासून हे दवाखाने सकाळी नऊ ते दुपारी साडेचार या वेळेत सुरू ठेवले जातात. मात्र, पशुपालक, शेतकरी सकाळी शेतात गेला की तो सायंकाळी परततो. पण, परतल्यावर जर त्याला जनावरांसाठी काही वैद्यकीय सल्‍ला घ्यायचा असेल, उपचारांची गरज असेल तर मात्र पंचाईत होऊ लागली. कारण पशुपालक दवाखान्यात व डॉक्‍टर घरात अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या दवाखान्यांच्या वेळेत बदल करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यांच्या माध्यमातून पशुधनासाठी विविध सेवा दिल्या जातात. पूर्वी उन्‍हाळ्यात या दवाखान्यांची वेळ ही सकाळी सात ते दुपारी बारा व चार ते सायंकाळी सहा; तर हिवाळ्यात ही वेळ सकाळी आठ ते दुपारी एक व तीन ते सायंकाळी पाच अशी होती. मात्र, याला संघटनांनी विरोध केला होता. त्यांच्या विरोधानंतर ही वेळ सकाळी नऊ ते दुपारी साडेचार अशी ठेवली. याचा सर्वाधिक फटका लसीकरणास बसला आहे. कारण डॉक्‍टरांच्या वेळेत लसीकरणासाठी जनावरेच उपलब्‍ध नसल्याने लसीकरणात वाढ होणार कशी, असा प्रश्‍‍न निर्माण झाला.

त्यामुळे काही ठिकाणी सकाळी गेलेली जनावरे सायंकाळीच गोठ्यात येतात. यानंतर जर एखाद्या जनावराची तक्रार सुरू झाली तर मात्र यात मोठी अडचण होते. कारण, बहुतांश जनावरांच्या दवाखान्यातील डॉक्‍टर हे त्यांच्या मुख्यालयात राहत नाहीत. सेवा देण्यात अडथळे निर्माण होतात.

गावाकडे बहुतेक जनावरे चरायला जातात. सकाळी गेलेली जनावरे सायंकाळी परततात. अनेकदा चुकीची वनस्‍पती खाल्ल्याने जनावरांना पोटदुखी, बुळकांडी असा आजार होतो. मात्र, त्याचवेळी डॉक्‍टर जागेवर नसल्याने धावपळ करावी लागते.

- प्रकाश लाड, तांब्याचीवाडी, भुदरगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com