
Stone Pelting Incident Kolhapur : फक्त २२ वर्षांचा साद... रात्री नऊ ते पहाटे दोन मार्केट यार्डात काम, दिवसभर वडिलांसोबत टेम्पोतून भाजी विक्री, कष्टावर विश्वास ठेवणारे सनदी कुटुंब राजेबागस्वार दर्गा परिसरात भाडेकरू म्हणून राहतात. आईने बचतगटातून कर्ज काढून घेतलेला टेम्पो म्हणजे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा आधार होता. शुक्रवारी रात्री उसळलेल्या दगडफेकीत कुटुंबाचा कसलाही संबंध नव्हता. मात्र, जमावाने रागाच्या भरात त्यांचा टेम्पो पेटवून टाकला. काही क्षणात स्वप्नं, कष्ट आणि आधार देणारा तो टेम्पो राखेत बदलला.