esakal | Kolhapur | प्रभागनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

 महापालिका कोल्हापूर

कोल्हापूर : प्रभागनिहाय लोकसंख्येचे वर्गीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आगामी महापालिका निवडणुकीसाठी २०११ च्या जनगणनेनुसार प्रभागनिहाय लोकसंख्येच्या वर्गीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. नंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या फोडल्या जातील. मार्चमध्ये प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एक प्रभाग सदस्य रचनेनुसार २१ डिसेंबरला आरक्षण सोडत झाली होती. बहुसदस्यीय रचनेमुळे प्रक्रिया रद्द झाली आहे. त्यावेळी जानेवारी २०२१ ची मतदारयादी गृहीत धरली होती. कोरोनामुळे निवडणूक पुढे गेली तसे नव्याने नोंद होणाऱ्या मतदारांची वाढ झाली. जानेवारी २०२२ ला ज्यांच्या वयाला अठरा वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांचाही समावेश मतदारयादीत करावा लागणार आहे.

तूर्तास प्रभागनिहाय लोकसंख्या नंतर मतदारसंख्या निश्‍चित करण्यासाठी २०११ च्या जनगणनेनाचा आधार घ्यावा लागत आहे. यावर्षी नव्याने जनगणना होणे अपेक्षित होती. मात्र, ती न झाल्याने दहा वर्षांपूर्वीच्या जनगणनेचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा: कोविड लॅबने गाठला एक लाखाचा पल्ला; दररोज तपासणी करिता येत आहे तीन ते चार हजार नमुने

बहुसदस्यीय रचनेत तीन प्रभागांचा एक प्रभाग होईल. एका प्रभागाची मतदारसंख्या जास्तीत जास्त वीस हजार इतकी असेल. ८१ प्रभागांचे रूपांतर २७ प्रभागात होईल. शहराची सध्याची लोकसंख्या ही २०११ च्या जनगणनेनुसारच निश्‍चित केली गेली आहे.जनगणनेनुसार प्रभागनिहाय लोकसंख्या निश्‍चित होईल. नंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या फोडल्या जातील. जे तीन प्रभाग एकत्रित करायचे आहेत त्यासाठी भौगोलिक संलग्नता हाच निकष असेल. पूर्वी निवडणुकीच्या आधी दोन ते तीन महिने इच्छुक कामाला लागायचे. आता बहुसदस्यीय रचनेनुसार प्रभाग निश्‍चित होणार असूनही इच्छुक पुढे येत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर अखेर जनगणनेनुसार गट निश्‍चित होतील. त्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे.

loading image
go to top