Satej Patil : पाईपलाईन आली शब्द खरा केला.. सतेज पाटलांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रू

त्यावेळी पंपिंग स्टेशनच्या इमारतीची पाहणी करून पंप बसवण्याची माहिती घेतली. जवळपास ३५ वर्षांपासून शहरवासीयांच्या थेट पाईपलाईन योजनेच्या मागणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला.
satej patil pipeline
satej patil pipelinesakal

Kolhapur - जॅकवेलवर पंप बसवण्याबरोबरच वीजवाहिनी, उर्वरित पाईपलाईनची स्वच्छता अशी थेट पाईपलाईन योजनेतील सारी कामे ऑगस्टअखेर पूर्ण होतील. त्यानंतर महिनाभर चाचणी घेतली जाईल, असे सांगत आमदार सतेज पाटील यांनी योजनेच्या कामाची डेडलाईन आज स्पष्ट केली. त्यांच्या हस्ते काळम्मावाडी धरणस्थळावर जॅकवेलच्या पाण्याचे पूजन करण्यात आले.

satej patil pipeline
Mumbai Police : महिलांशी चॅटिंग करून त्रास देणाऱ्यांना पोलिसांकडून कारवाईचा इशारा

योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या जॅकवेलमध्ये धरणाचे पाणी आल्यानंतर सतेज पाटील यांनी आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील व कॉंग्रेस, राष्ट्रवादी नगरसेवकांच्या उपस्थितीत जॅकवेलला भेट दिली.

त्यावेळी पंपिंग स्टेशनच्या इमारतीची पाहणी करून पंप बसवण्याची माहिती घेतली. जवळपास ३५ वर्षांपासून शहरवासीयांच्या थेट पाईपलाईन योजनेच्या मागणीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. हा मोठा आनंदाचा क्षण असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

satej patil pipeline
Mumbai News : 'भाजपा का साथ गद्दर के साथ' म्हणणं भोवलं! पोस्टर झळकावल्याने मुंबईत गुन्हा दाखल

ते म्हणाले, ‘९४० एचपीचे चार पंप बसवण्यात येणार आहेत. त्यातील तीन पंप २४ तास कार्यान्वित राहणार असून एक पंप दर तासाला २६ हजार १०० लिटर पाण्याचा उपसा करेल. त्यामुळे दर तासाला एकूण ७८ हजार ३०० हजार लिटर पाणी जॅकवेलमधून उपसा केले जाणार आहे. पंप बसवण्याचे काम सुरू झाले असून दोन पंप पहिल्या टप्प्यात बसवले जातील.

उपसलेले पाणी १५ लाख लिटर क्षमतेच्या ब्रेक प्रेशर टॅंकमध्ये सोडून तिथून सायफनने पुईखडीपर्यंत येणार आहे. त्यासाठी ५३ किलोमीटरच्या पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील २२ किलोमीटरच्या पाईपची चाचणी झाली आहे. उर्वरित पाईपची स्वच्छता तसेच जोडाचे काम पूर्ण केले जाणार आहे. भुयारी वीजवाहिनीचे काम सुरू झाले आहे.

satej patil pipeline
Mumbai Police : मुंबई पोलिसांनी केला हजारो महिलांच्या तक्रारीचा निपटारा

एका जॅकवेलवरील पंपिंग स्टेशनचा स्लॅब झाला आहे. दुसऱ्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरण केंद्राचे काम झाले आहे. शिल्लक कामे ऑगस्टअखेर पूर्ण करून त्यानंतर योजनेची चाचणी घेतली जाणार आहे.

स्काडा सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी चाचणी घेतली जाईल. योजना दिवाळीपूर्वी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. कसबा बावडा, शिंगणापूर ही जुनी उपसा केंद्रे पर्याय म्हणून सुरू राहणार आहेत.

satej patil pipeline
Mumbai Police : महिलांशी चॅटिंग करून त्रास देणाऱ्यांना पोलिसांकडून कारवाईचा इशारा

यावेळी शारंगधर देशमुख, सुनील पाटील, राजेश लाटकर, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, सचिन पाटील, डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे, संदीप कवाळे, श्रावण फडतारे, राजेंद्र साबळे, सागर यवलुजे, आशपाक आजरेकर, संजय लाड, दिग्विजय मगदूम, ‘गोकुळ’चे संचालक राजू मोरे, आर. के. मोरे, जलअभियंता नेत्रदीप सरनोबत, संदीप डवर, जे. के. पाटील, जीकेसीचे प्रकल्प व्यवस्थापक राजेंद्र माळी व युनिटी कन्लटंटचे विजय मोहिते उपस्थित होते.

शहरवासीयांच्यादृष्टीने हा आनंदाचा क्षण आहे. त्यांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता होत असल्याने मोठे आत्मिक समाधान लाभत आहे. पुण्याईचे काम करण्याचे भाग्य मला मिळाले. विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर मिळाले आहे.

- सतेज पाटील, आमदार

आनंदाश्रू तरळले

थेट पाईपलाईन झाली नाही तर निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी २०१४ मध्ये योजना मंजूर करण्यापासून सतत पाठपुरावा केला. अनेक टप्प्यांवर आलेल्या अडचणींवर मार्ग काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

शहरवासीयांच्या ४० वर्षांपासूनच्या मागणीच्या पूर्ततेच्या टप्प्यावर आता योजना पोहोचली आहे. आज पाहणीसाठी गेल्यानंतर जॅकवेलमध्ये आलेले पाणी पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा क्षण इतिहासात नोंदवला जाणार असल्याने ते काही क्षण भावुक झाले.

satej patil pipeline
Mumbai News : 'भाजपा का साथ गद्दर के साथ' म्हणणं भोवलं! पोस्टर झळकावल्याने मुंबईत गुन्हा दाखल

योजनेतून पाणीपुरवठा

० दरडोई १३५ लिटर प्रतिदिन

० २०४५ पर्यंत १० लाख २९ हजार ९६७ लोकसंख्येसाठी

उपसा

तीन पंपातून प्रतीतास प्रत्येकी २६ हजार १०० लिटर

२०३० मध्ये १८० दशलक्ष लिटर

२०४५ मध्ये २३८ दशलक्ष लिटर

शुद्धीकरण केंद्र

पुईखडी येथे ८० एमएलडी क्षमता.

सायफनने वितरण

पुईखडी ते फुलेवाडी जलशुद्धीकरण केंद्र

पुईखडी ते शेंडा पार्क

चंबुखडी साठवण टाकीसाठी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com