कोल्हापूर: शहरात थंडी चांगलीच वाढली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत खाली आला होता. पहाटे पासूनच गारठा वाढला होता. दिवसभर हवा थंड होती. त्यामुळे रात्री शेकोट्या पेटवून नागरिकांनी थंडीचा आनंद घेतला. .जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढल्याने थंडीचे आगमन उशिरा झाले; मात्र गेल्या आठ दिवसांत तापमानात दिवसेंदिवस घट होऊन थंडी वाढत आहे. आज पहाटे शहरासह उपनगरात दाट धुके पसरले होते. सकाळी नऊपर्यंत सूर्य दर्शन झाले नव्हते. .Maharashtra Cold Wave : तापमान ८ अंशांवर घसरले! महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 'येलो अलर्ट'.त्यानंतर ऊन पडले; पण दिवसभर गारठा होता. संध्याकाळी पाचनंतर पारा खाली येण्यास सुरुवात झाली. रात्री नऊ वाजता तापमान १८ वर होता. त्यानंतर मध्यरात्रीनंतर तापमानात आणखी घट झाली..मध्यरात्रीनंतर सुमारे १४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले होते. थंडीचा कडाका वाढल्याने दसरा चौकातील उबदार कपड्यांच्या स्टॉलवर ग्राहकांनी गर्दी केली होती. दिवसभर चहाचे स्टॉल आणि गरम पदार्थांच्या हातगाड्यांवरही वर्दळ होती. रात्री काही ठिकाणी शेकोट्या पेटवून लोकांनी थंडीचा आनंद घेतला. .Nagpur Cold Wave: बापरे, नागपूर महाबळेश्वरपेक्षाही थंड; विदर्भात थंडीची लाट, नागपूर १२.२ गोंदिया १०.४.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तापमान कमाल २१ तर किमान १२ अंशापर्यंत राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. थंडी आणि धूळ, धुरांमुळे कान, नाक, घसा, ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णात वाढ झाली आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कानटोपी, स्वेटर बरोबर ज्येष्ठांनी पहाटे फिरायला जाणे टाळावे, अशा सूचनाही डॉक्टरनी दिलेल्या आहेत..यलो अलर्टनंदुरबार धुळे जळगाव जालना, छत्रपती संभाजीनगर बीड परभणी, हिंगोली नांदेड नाशिक, लाट असलेली ठिकाणे (अं.से.), धुळे ८ निफाड ८ परभणी (कृषी) ८.५, जेऊर ९, गोंदिया ९.६ भंडारा१०..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.