Kolhapur Winter : वाढत्या थंडीने शहरवासीयांना हुडहुडी; पारा १५ अंश सेल्सिअसवर
रात्री थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. सकाळी उशिरा दुकाने उघडली जात असल्याचे चित्र आहे. गेले काही दिवस नागरिक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत.
कोल्हापूर : वाढत्या थंडीने शहरवासीयांना हुडहुडी भरली असून, पारा १५ अंश डिग्री सेल्सिअसवर आला आहे. रात्री थंडीपासून संरक्षण करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. सकाळी उशिरा दुकाने उघडली जात असल्याचे चित्र आहे.