कोल्हापूर : डंपरखाली चिरडून महिला जागीच ठार

भोगावती साखर कारखाना ते परिते दरम्यान आज डंपरखाली चिरडून एक महिला ठार झाली
 एक महिला ठार
एक महिला ठारsakal

राशिवडे बुद्रुक: भोगावती साखर कारखाना ते परिते दरम्यान आज डंपरखाली चिरडून एक महिला ठार झाली. अंजना बळीराम किरुळकर ( वय 56 रा. राशिवडे खुर्द, ता. राधानगरी) असे या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संदीप किरुळकर हा आई अंजना यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांना भोगावती येथील दवाखान्यात दाखवून राशिवडे बुद्रुक येथे निघाला होता. ठिकपूर्ली फाट्यावर आल्यानंतर कोल्हापूरकडे चाललेल्या डंपर (एम. एच. 09 ए. एल. 2395 ची बाजू काढून पुढे जात असताना दुचाकी कलल्याने अंजना या खाली पडल्या. त्या डंपरच्या चाकात सापडल्या. चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. घटनास्थळी तातडीने नागरिक जमा झाले मात्र उपचारासाठी नेण्याची स्थिती नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com