esakal | कोल्हापूर: महिला सुरक्षेला प्राधान्य; टवाळखोरांना हिसका
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: महिला सुरक्षेला प्राधान्य; टवाळखोरांना हिसका

कोल्हापूर: महिला सुरक्षेला प्राधान्य; टवाळखोरांना हिसका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोरोना संकटात शाळा महाविद्यालये जरी बंद असले तरी जिल्ह्यात निर्भया पथके अव्याहत कार्यरत आहेत. या पथकांनी महिलांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने गर्दीची ठिकाणे, मंदिरे, पर्यटनस्थळांसह मोर्चे आंदोलनावर सध्या लक्ष केंद्रीत केले आहे.

हेही वाचा: जेवण न मिळाल्यास मला फोन करा!

निर्भयाच्या घटनेनंतर महिला सुरक्षेला राज्यात प्राधान्य देण्यात आले. राज्यात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार घडले. तशी महिलांच्या सुरक्षेसंबधी पुन्हा चर्चा सुरू झाली. महिलांच्या सुरक्षेतेसाठी जिल्ह्यात ऑगस्ट २०१६ ला निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली. ही पथके आपापल्या हद्दीतील छेडछाडीचे प्रकार रोखण्याबरोबर महिलेच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने काम करू लागली.

शाळा, महविद्यालये, गर्दीच्या ठिकाणी, बाग बगीचे अशा ठिकाणावर या पथकांची गस्त अधिक परिणामकारक ठरू लागली. साध्या गणवेशातील एक महिला पोलिस अधिकाऱ्यांसह पाच ते सहा कर्मचाऱ्यांच्या या पथकांनी टवाळखोरांवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. निर्जनस्थळी होणाऱ्या चेन स्नॅचिंग सारख्या प्रकारांना काही प्रमाणात आळा घालता आला.

गेल्या वर्षापासून कोरोना संकटामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद आहेत. याकाळात आवश्यक त्यावेळी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे जिल्ह्यातील छेडछाडीचे प्रकारांना चांगलाच ब्रेक लागला. तरीही निर्भया पथके अॅक्टीव्ह राहीली आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पर्यटन स्थळावर गर्दी होऊ लागली आहे. सण उत्सवातील बंदोबस्त, मोर्चे आंदोलनांचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने गर्दी होणाऱ्या सर्वच ठिकाणी निर्भया पथकाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

सहा पथके :

कोल्हापूर, करवीर, इचलकरंजी, जयसिंगपूर, शाहूवाडी, गडहिंग्लज अशी निर्भयाची सहा पथके आहेत. कोरोना संकटामुळे सुमारे दीड एक वर्षे शाळा महाविद्यालये बंद आहेत. तरी या पथकांचा गर्दीची ठिकाणे, मंदिरे, मुख्य चौक, बाग बगीचावर वॉच कायम आहे.

निर्भया पथकाची कारवाई

वर्ष गुन्हे दाखल समुपदेशन प्रतिबंधात्मक कारवाई वाहनांवर कारवाई

2019 09 24,141 15,668 6,846

2020 06 2,882 1,351 507

loading image
go to top