

District officials announce election campaign restrictions ahead of polling.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या ४८ तास अगोदर जाहीर प्रचाराची सांगता होईल. ही निवडणूक भयमुक्त, शांततेत व विनाअडथळा पार पडावी, तसेच आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.