

Political leaders and party workers intensify preparations ahead of Kolhapur Zilla Parishad elections.
sakal
कोल्हापूर : तीन वर्षांपूर्वी राज्यातील बदललेली समीकरणे, त्याचे जिल्ह्याच्या राजकारणात उमटलेले प्रतिबिंब पाहता, जिल्हा परिषदेची सत्ता राखणे काँग्रेसमोर मुख्य आव्हान असेल. त्यात केंद्र व राज्यात असलेली महायुतीची सत्ता, त्यातून मिळालेले बळ आणि महायुतीतील दिग्गज नेत्यांची फौज यांचा सामना करताना काँग्रेसची दमछाक होणार आहे.