Crowd of candidates and supporters during nomination filing in Kolhapur.
sakal
कोल्हापूर
Kolhapur ZP -PS : कोल्हापूर जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी अर्जांची झुंबड; कार्यालयांत पाय ठेवायलाही जागा नाही
Nomination Rush : कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक कार्यालयांच्या परिसरात अक्षरशः झुंबड उडाली.
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज अक्षरशः झुंबड उडाली. सकाळपासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयांच्या परिसरात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, समर्थक आणि वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

