Kolhapur Zilla Parishad : कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध, 'या' मतदार संघात झाले बदल

Kolhapur ZP Final Draft 2025 : जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्यावर घेण्यात आलेल्या हकरतीनुसार कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बाणगे मतदारसंघाचे नाव बदलून म्हाकवे केले आहे.
Kolhapur Zilla Parishad
Kolhapur Zilla Parishadesakal
Updated on
Summary

जिल्हा परिषदेच्या ६८ गटांची तालुकानिहाय संख्या व नावे

शाहूवाडी - शित्तूर तर्फे वारुण, सरुड, बांबवडे व आंबार्डे ( ४ गट)

पन्हाळा - सातवे, कोडोली, पोर्ले तर्फे ठाणे, यवलूज, कोतोली व कळे (६ गट)

हातकणंगले - घुणकी, भादोले, कुंभोज, आळते, शिरोली, रुकडी, रुई, कोरोची, कबनूर, पट्टणकोडोली व रेंदाळ (११ गट)

शिरेाळ - दोनोळी, उदगाव, आलास, नांदणी, यड्राव, अब्दुललाट व दत्तवाड (७ गट)

कागल - कसबा सांगाव, सिद्धनेर्ली, बोरवडे, म्हाकवे, चिखली व कापशी (६ गट)

करवीर - शिये, वडणगे, उचगाव, मुडशिंगी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, कळंबे तर्फ ठाणे, पाडळी खुर्द, शिंगणापूर, सांगरूळ, सडोली खासला व निगवे खालसा (१२ गट)

गगनबावडा - तिसंगी व आसळज (२ गट)

राधानगरी - कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे व राधानगरी (४ गट)

भुदरगड - गारगोटी, पिंपळगाव, आकुर्डे व कडगाव (४ गट)

आजरा - उत्तूर व पेरणोली (२ गट)

गडहिंग्लज - गडहिंग्लज, कसबा नूल, हलकर्णी, भडगाव, गिजवणे व नेसरी ( ६ गट)

चंदगड - आडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये (४ गट)

Kolhapur Political : जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्यावर घेण्यात आलेल्या हकरतीनुसार कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बाणगे मतदारसंघाचे नाव बदलून म्हाकवे केले आहे. उर्वरित गटांची संख्या आणि मतदारसंघांची नावे जैसे-थे ठेवून ६८ मतदारसंघाचा अंतिम प्रारूप आराखडा विभागीय आयुक्तांनी आज प्रसिध्द केला आहे. त्यामुळे आता प्रभागनिहाय आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेची निवडणूक अधिक गतिमान होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्रारूप आराखड्यावर १३२ हरकती घेतल्या होत्या. या हकरतींपैकी १२४ हरकती फेटाळल्या आहेत. उर्वरित कागल तालुक्यातील ६, तर चंदगड २ हकरतींवर बदल करण्यात आला. कागल तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाचऐवजी सहा मतदारसंघ तयार केले आहेत. यामध्ये नव्याने तयार झालेल्या बाणगे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नाव रद्द करून म्हाकवे मतदारसंघ केला आहे. म्हाकवे ग्रामस्थांनी दाखल केलेल्या हरकती मान्य केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com