
Kolhapur City : कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या उचगाव, पाचगाव, मोरेवाडी, सरनोबतवाडी, कळंबा तर्फे ठाणे, नवे बालिंगा, पाडळी खुर्द (वाढीव वस्ती), पिरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश असणाऱ्या गावांमधील वस्तुस्थितीदर्शक अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना आज दिला.