

Kolhapur ZP Teacher Recruitment
esakal
फुलेवाडी: कोल्हापूर जिल्हा परिषदेत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार आहेत. शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागासाठी नुकतीच उमेदवारांची शिफारस केली. एकूण ६२५ रिक्त पदांसाठी जाहिरात दिली होती, त्यापैकी ४४५ पात्र उमेदवारांची निवड केली आहे.