

Arihant Podcast London
esakal
London Marathi Youth Podcast : संभाजी गंडमाळे : परदेशात शिकणाऱ्या पोरांच्या आई-बाबांनी येथे एकत्र येऊन पोरांसाठी सपोर्ट ग्रुप तयार केला आहे. त्याचवेळी आता परदेशात स्थायिक झालेल्या कोल्हापूरकर पोरांनीही परदेशात शिकण्यासाठी नव्याने येणाऱ्या मराठी पोरांसाठी पॉडकास्ट सुरू केला आहे आणि त्याला चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.
लंडनमध्ये पाच वर्षे बांधकाम क्षेत्रात प्लॅनर म्हणून काम करणाऱ्या अरिहंत आडके याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. परदेशात शिकायला जाऊ इच्छिणाऱ्या पोरांसह पालकांसाठीही हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार आहे.