
शिवाजी यादव
काेल्हापूर : कोल्हापुरात येणारा भाजीपाला, कांदा बटाटा मोठ्या प्रमाणात कोकण गोव्याकडून पाठवला जात होता, मात्र गेल्या पाच वर्षांत गोव्यात व कोकणात भाजीपाला उत्पादन वाढले, तसेच अन्य पर्याय उपलब्ध झाले. त्यामुळे कोल्हापुरातून कोकणात गोव्याकडे जाणाऱ्या शेतीमालाचे प्रमाण ३५ ते ४० टक्क्यांनी घटले असून, कोल्हापुरात रोज १५ ते २५ लाखांची उलाढाल घटली आहे. परिणामी येथील भाजीपाल्याला पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील, अशी स्थिती आहे.