Kolhapur Tamraparni River : कोवाडला ताम्रपर्णी नदीत; पाच मगरींचा वावर
Crocodile Movement : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नदीकाठावर नागरिकांची गर्दी उसळली असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
कोवाड : येथील ताम्रपर्णी नदीपात्रात पाच मगरींचा वावर असल्याचे आज नागरिकांच्या निदर्शनाला आले. दुपारी दीडच्या सुमारास नदीतील मगरींचा मुक्त वावर पाहून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.