Kumbhi Dam : कुंभी धरणात २ टीएमसी साठा शिल्लक; गतवर्षीपेक्षा ७% घट, तरीही सिंचनासाठी दिलासा

Water Storage Update : गगनबावडा तालुक्यातील कुंभी मध्यम प्रकल्पात सध्या २ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून तो क्षमतेच्या ७४ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घट झाली.
Water level view of Kumbhi Dam

Water level view of Kumbhi Dam

sakal

Updated on

असळज : तीन तालुक्यांतील ५४ गावांना सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कुंभी मध्यम प्रकल्पात २ टीएमसी पाणीसाठा शिल्‍लक आहे. प्रकल्प क्षमतेच्या तो ७४ टक्के असून, गतवर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. अणदूर, कोदे व वेसरफ या तीन लघुप्रकल्पांतही पुरेसा पाणीसाठा शिल्‍लक आहे. तालुक्यातील पाटबंधारे प्रकल्पामध्ये शिल्‍लक असलेला पाणीसाठा ३० जूनअखेर सिंचनासाठी पुरेल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com