"जिल्हाधिकारी व साखर सहसंचालक हे कारखानदारांच्या हातातील बाहुले आहेत. वास्तविक पाहता जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी जाहीर केलेला दर हा एफआरपीपेक्षा कमी आहे."
कोल्हापूर : जिल्ह्यातील कुंभी-कासारी, दालमिया शुगर आणि देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार-पंचगंगा साखर कारखान्यांनी (Sugar Factory) यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रतिटन उसाला सर्वाधिक ३,३०० रुपये एफआरपी जाहीर केली आहे, तर इतर कारखान्यांच्या तुलनेत कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने (Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory) सर्वांत कमी म्हणजे प्रतिटन ३,०५० रुपये एफआरपी दिली आहे.