esakal | पुरुषी मक्ता मोडत उंदरवाडीच्या कांबळे मावशींच्या अनोख्या धाडसाचं होतयं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषी मक्ता मोडत उंदरवाडीच्या कांबळे मावशींच्या अनोख्या धाडसाचं होतयं कौतुक

पुरुषी मक्ता मोडत उंदरवाडीच्या कांबळे मावशींच्या अनोख्या धाडसाचं होतयं कौतुक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बिद्री : ग्रामीण भागात (village) विशेषतः पावसाळ्यात पाळक पाळण्याची प्रथा आजही आहे. पाळक सादवण्याचा पुरुषांकडे असलेला मक्ता मोडत उंदरवाडी (ता. कागल) येथील मंगल (kagal) कांबळे हे काम करीत आहेत. यातील अल्प मोबदल्यात त्या आठ जणांचे कुटुंब चालवत आहेत. कागल तालुक्यात उंदरवाडी (undarvadi) गाव डोंगर पायथ्याला आहे. ग्रामदैवत बेलजाई देवीमुळे मृग नक्षत्रापासून दसऱ्यापर्यंत बेलजाई देवीचे (beljai devi) प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी पाळक पाळले जातात. पाळक सादवण्याचे काम गावातील कै. परसू कांबळे यांच्यानंतर मुलगा श्रावण कांबळे व नातू साताप्पा कांबळे यांनी काम केले. (kolhpaur distritct)

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

साताप्पा कांबळे यांना आजारपणामुळे पाळक सादवणे शक्य होणार नसल्याने, ही जबाबदारी पत्नी मंगल यांनी स्वीकारली. मंगल मोठ्या हिमतीने बाहेर पडल्या आणि त्यांनी पहिल्या वेळी खड्या आवाजात मुख्य चौक आणि गल्ली-बोळात जाऊन पाळक सादवला. सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असताना, गाव पाळक सादवण्याच्या कामात महिला मागे नाहीत हेच त्यांनी दाखवून दिले. या मोबदल्यात गावपाटलांकडून वर्षाला दोन पोती भात दिले जातात. त्यावर आठ लोकांचे कुटुंब जगत आहे.

"पतीच्या आजारपणामुळे त्यांना गावपाळक सादवण्याचे काम जमणार नाही, हे स्पष्ट झाल्यावर मी धाडसाने बाहेर पडले. गावकऱ्यांनी माझ्या धाडसाचे कौतुक करून पाठिंबा दिला. या मोबदल्यातून काय मिळते, यापेक्षा गावची आणि देवीची सेवा केल्याचे समाधान आहे."

- मंगल कांबळे, उंदरवाडी

loading image