
Blood Evidence Lakhan Benade : मलिग्रेच्या डोंगरातील घनदाट जंगल, वाहनांचा मागमूसही नाही, मानवी वस्तीपासून अगदी दूरचे ठिकाण लखनच्या खुनासाठी ठरविण्यात आले. स्थानिक रहिवासी आशीष अरुण शिंत्रे (वय २१) याचा मित्र असलेल्या आकाश घस्तेने यामध्ये पुढाकार घेतला. १० जुलैला लखन बेनाडेचा ज्या ठिकाणी खून करण्यात आला, त्या ठिकाणी बुधवारी संशयित आकाश घस्तेला फिरवले. फॉरेन्सिक विभागनेही येथे काही नमुने तपासासाठी घेतले.