राधानगरी - कोनोलीत भूस्खलनामुळे घर गाडले; 2 जण दगावल्याची शक्यता

तुळशी-धामणी परिसरातीत ढगफुटी सारख्या उचांकी पावसामुळे ही घटना घडली आहे.
राधानगरी - कोनोलीत भूस्खलनामुळे घर गाडले; 2 जण दगावल्याची शक्यता
Updated on: 

राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यातील (radhanagari) कोनोली येथे भुस्खलन होऊन एक घर गाडले गेले. यात दोन व्यक्ती सापडल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तुळशी-धामणी (tulashi-dhamani) परिसरातीत ढगफुटी सारख्या (heavy rain) उचांकी पावसामुळे ही घटना घडली आहे. या तालुक्यातील अनेक गावांवर अशा घटनांची टांगती तलवार आहे. (kolhapur rain update)

कोनोली (konoli) या गावांचा चहुबाजूंनी संपर्क तुटला आहे. धामणी नदीला आलेल्या पुराचे पाणी गावाच्या दोन्हीकडे असणाऱ्या ओढ्यावर आल्याने रस्ते बंद आहेत. ठिकठीकाणी रस्ते खचले आहेत. यामुळे त्या गावात जाता येत नाही. या गावातील एका घरावर भूस्खलन होऊन घराची भिंत कोसळल्याने पती-पत्नी दोघे अडकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अद्याप काय झाले हे समजलेले नाही. गावाचे पूर्ण दळणवळण मोबाईल, टेलीफोन बंद झाल्याने वस्तुस्थिती समजणे अवघड झाले आहे. रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार मीना निंबाळकर यांनी दिली आहे.

राधानगरी - कोनोलीत भूस्खलनामुळे घर गाडले; 2 जण दगावल्याची शक्यता
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

आज शुक्रवार 23 जुलै सकाळी 6 वाजता

राधानगरी धरण (radhanagari dam) परिसरात गेल्या 24 तासात विक्रमी 567 मिलीमीटर पाऊस झाला असून पाणी पातळी 341.30 फूट झाली आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी 347.5 फूटाती आवश्यकता असते. आता फक्त 6 फूट पाणी कमी आहे. सर्व नदीकाठ व परिसरातील नागरिकांते स्थलांतर करणे सुरु आहे. धरणाचे दरवाजे उघडल्या नंतर पाणी पातळीत कमालीची वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com